मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईतला शरद पवारांचा बंगला सिल्व्हर ओकमध्ये अजित पवार पोहोचले आहेत. यावेळी सुप्रिया सुळे, अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार, बंधू श्रीनिवास पवार आणि शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार उपस्थित असून पवार परिवारामध्ये चर्चा सुरु झाली आहे.
काहीच वेळापूर्वी शरद पवारही पुण्याहून मुंबईला आले होते. अजित पवार यांच्यासोबत त्यांचे बंधू श्रीनिवास पवारही उपस्थित आहेत. तर सिल्व्हर ओक बंगल्यात सुप्रिया सुळे, अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवारही आहेत. पण राजेंद्र पवार आणि रोहित पवार मात्र अनुपस्थित आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, काल संध्याकाळी अजित पवार यांनी अचानक त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता.