
जळगाव प्रतिनिधी । घरासमोर पार्किंग करून लावलेल्या उभ्या कारला मागून अज्ञान कारने धडक दिल्याने कारचे नुकसान झाले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, निखील अशोक जैन (वय 34) रा. प्रभात कॉलनी, सीसीडीसी अपार्टमेंट यांची मालकीची मारूती कार (एमएच 19 एएक्स 1612) राहत्या घरासमोर 24 सप्टेंबर 2019 रात्री 10.30 वाजेच्या सुमारास लावली होती. घराच्या बाजूला हॉटेल पांचालीचा वॉचमन याने सांगितले की, तुमच्या गाडीला स्कोडा ॲक्टव्हीया या कारने धडक दिली. निखील जैन हे लागलीच मारूती कारजवळ गेले असता सदरील धडक देणारी कार घटनास्थळाहून पसार झाली होती. या घटनेत कारच्या मागच्या बाजूला धडक दिल्याने 20 हजार रूपयाचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी जैन यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीसात अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोकॉ विश्वनाथ गायकवाड करीत आहे.



