जळगाव, प्रतिनिधी | भारत निवडणूक आयोगातर्फे स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन गुरुवार २६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता करण्यात आले आहे.
या मतदान जनजागृती रॅलीस शिवतीर्थ मैदानापासून जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे झेंडे सुरुवात करतील. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एम. पाटील, उपजिल्हाधिकारी तुकाराम हूलवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. याप्रसंगी संकल्प पत्राचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. ही रॅली शिवतीर्थ मैदान, नेहरू चौक, टावर, जुने बस स्थानक मार्गाने पुन्हा शिवतीर्थ मैदनावर पोहचणार आहे. या कार्यक्रमास प्रांताधिकारी दीपमाला चौरे, तहसीलदार वैशाली हिंगे उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा नोडल अधिकारी तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील, साहाय्यक नोडल अधिकारी किशोर गायकवाड, डॉ. मिलिंद बागूल, अतुल इंगळे, तालुका स्वीप अधिकारी फिरोज पठाण, रविकिरण बिऱ्हाडे यांनी केले आहे.