जळगाव, प्रतिनिधी | जळगाव जिल्हा बुध्दिबळ संघटनातर्फे जळगाव तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन कांताई सभागृहात करण्यात आले होते. १४,१७, व १९ वर्षातील गटात एकूण १५५ खेळाडूंचा स्पर्धेत सहभाग होता. विजेत्या खेळाडूंची निवड ही जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली.
विजेत्या खेळाडूंना मेडल महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार फारुक शेख, जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे सहसचिव संजय पाटील, रवींद्र धर्माधिकारी व तालुका क्रीडा समन्वयक प्रशांत कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. बुध्दिबळ स्पर्धा अंतिम निकाल मुले : १४ वर्ष वयोगट :– ध्रुव कुलकर्णी ६ गुण थेपडे विद्यालय म्हसावद , प्रणव क्षिरसागर ५ गुण काशिनाथ पलोड विद्यालय सावखेडा, दर्शन चौधरी ५ गुण शानभाग विदयालय , राज भंगाळे ४.५ गुण अनुभूती इंटरनॅशनल स्कूल शिरसोली, मेहुल पाटील ४.५ गुण रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल . १७ वर्ष वयोगट:- अथांग शिंपी ६ गुण शानभाग विद्यालय सावखेडा , जयेश विवरेकर ५ गुण शानभाग विद्यालय सावखेडा, पंकज सपकाळे ५ गुण लाठी विद्यालय भोकर, ऋषिकेश काकडे ४.५ गुण अनुभूती इंटरनॅशनल स्कूल, अथर्व बारकारे ४.५ गुण काशिनाथ पलोड विद्यालय सावखेडा. १९ वर्ष वयोगट :- मयांक वानरे ५ गुण अनुभूती इंटरनॅशनल शिरसोली , चैत्य गाला ४ गुण इंटरनॅशनल शिरसोली , श्रीनिवास शिसोदे ३.५ गुण रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल, नमन जैन ३.५ गुण रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल ,निलेश पाटील ३ गुण लाठी विद्यालय भोकर. स्पर्धेत पंच म्हणून प्रवीण ठाकरे व विकास भावे यांनी काम पाहिले.
.