Home Cities जामनेर नेरी दिगर येथील कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

नेरी दिगर येथील कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

0
38

neri diger foto

जामनेर, प्रतिनिधी | तालुक्यातील नेरी दिगर येथे वंचित बहुजन आघाड़ीमध्ये इतर पक्षात काम करणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी आज (दि.१५) अधिकृतरित्या प्रवेश केला. भिमराव मार्केट नेरी येथे हा प्रवेश कार्यक्रम पार पडला.

 

यावेळी तालुकाध्यक्ष सचिन सुरवाडे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जोहरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात उपस्थितांना मार्गदर्शन केले. सूत्र संचालन वंचित बहुजन आघाडीचे आकाश लोखंडे यांनी केले. गोपाळ कोळी, संदीप कोळी, सुनील धनगर, योगेश पाटील, योगेश कोळी, गोविंदा कोळी, भगवान कोळी, अमोल कोळी, निंबा धनगर, महेंद्र बाविस्कर यांनी यावेळी पक्षात प्रवेश केला.


Protected Content

Play sound