Home Cities एरंडोल गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचतांना हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू

गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचतांना हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू

0
29

71113341
 

एरंडोल (प्रतिनिधी) येथील गणपती विसर्जन मिरवणुकीत नाचत असताना एका वीस वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, औरंगाबाद येथे एका खासगी कंपनीत नोकरीला दिनेश विनोद बोरसे (वय २०) हा तरुण एरंडोल येथे गणेश विसर्जनासाठी आला होता. परंतु मिरवणुकीत नाचत असताना अचानक दिनेशला चक्कर आली आणि तो खाली कोसळला. त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, दिनेशचा मृत्यू हृदयविकाराचा झटक्याने झाल्याचे एरंडोल पोलिसांनी सांगितले.


Protected Content

Play sound