जामनेर, प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर समन्वय समितीने जुनी पेंशन लागू करावी यासह इतर मागण्यांसाठी ५ ते ८ सप्टेंबरपर्यंत काळ्या फिती लावून कामकाज केले होते. तसेच आज ९ सप्टेंबरला एकदिवसीय संप करून मागण्यांचे लेखी निवेदन जामनेरचे तहसीलदार टिळेकर यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, आज झालेल्या संपात तालुक्यासह राज्य भरातील १० लाख कर्मचारी झाले आहेत. प्रमुख मागण्यांमध्ये १९८२-८४ ची जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी, सर्व संवर्गातील सातव्या वेतन आयोगातील वेतनत्रुटी दुर कराव्यात, कंत्राटी धोरण बंद करून रिक्त पदे तात्काळ भरणे, केद्रांप्रमाणे सर्व भत्ते मिळावेत, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येवू नये. आरोग्य विभागातील कामाचे तास निश्चित होईपर्यंत बायोमेट्रिक प्रणाली आणू नये. अशा काही मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. निवेदन देतांना संदीप गायकवाड, सोपान पारधी, शेख इकबाल बद्रोद्दीन, विश्वास गोसावी, गोविंदा ठाकरे, विकास वंजारी, जितेंद्र नाईक, राजेश्वरी राजपूत, प्रतिभा चौधरी आदींची उपस्थिती होती.