जळगाव प्रतिनिधी | सायकलवरून घरी जाणाऱ्या ५५ वर्षीय प्रौढास मागून येणाऱ्या भरधाव क्रुझरने जोरदार धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याबाबत रामानंदनगर पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
याबाबत माहिती अशी की, पंडित शंकर पाटील (वय 55) रा. रथ चौक पिंप्राळा हे वेल्डिंगच्या दुकानावरून घरी येत असताना पिंप्राळा स्टॉपजवळ मागून येणाऱ्या भरधाव क्रुझरने जोरदार धडक दिली. या धडकेत पंडित पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याबाबत रामानंद नगर पोलिस वाला अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.