बेंगळुरू (वृत्तसंस्था) संपर्क तुटलेल्या विक्रम लँडरचा ठावठिकाणा लागला असून, ऑर्बिटरने लँडरची थर्मल छायाचित्रेही टिपली आहेत, अशी माहिती इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी दिली आहे.
चांद्रयान २ मोहीमेसंदर्भात मोठी आणि महत्वाची माहिती हाती लागली आहे. चंद्राच्या पृष्ठभागापासून काही अंतरावर असतानाच चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लँडरचा संपर्क तुटल्याने इस्त्रोच्या शास्त्रज्ञांसह सर्वांचे चेहरे उतरले होते. मात्र, काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर विक्रम लँडरचे ठिकाण शोधण्यात इस्त्रोला यश आले आहे. चंद्रावर विक्रम लँडरचे ठिकाण सापडले असून इस्त्रोचे प्रमुख के. सिवान यांनी ही आनंदवार्ता दिली आहे. “ऑर्बिटरने लँडरचे फोटो काढले असून संपर्क झालेला नाही. आम्ही संपर्क करण्याचे प्रयत्न करत आहोत”, अशी माहिती के. सिवान यांनी ‘एएनआय’ला दिली. आता या नवीन वृत्ताने इस्रोच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत.