उद्या जळगाव महानगरपालिकेअंतर्गत शालेय नेमबाजी स्पर्धा

mahapalika

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा क्रीडा कार्यालय आणि जळगाव शहर महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने म.न.पा.अंतर्गत रायफल शुटिंग स्पर्धेचे आयोजन उद्या दि. 8 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेदरम्यान करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शालेय निशाणेबाजी स्पर्धा पायोनीयर स्पोर्टस असोसिएशन बास्केटबॉलचे मैदान, शामा काँम्पलेक्सच्या मागे, गणपती नगर येथे घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन जळगाव जिल्हा रायफल असोसिएशनचे सचिव दिलीप गवळी यांच्याकडून करण्यात आले आहे.

Protected Content