किंग्जटन वृत्तसंस्था । भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडीजला २५७ धावांनी पराभव करत विजय मिळविला आहे. या विजयाचं सर्व श्रेय कर्णधार विराट कोहलीने संघ सहकाऱ्यांना दिले. पुढे कोहली म्हणाला, सर्वोत्तम खेळ करून सहज विजय मिळवण्यात संघ यशस्वी झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ‘आम्ही चांगला खेळ केला आणि तसा निकालही आमच्या बाजूने लागला. तो संघासाठी निश्चितच महत्वाचा आहे. काही सत्रांत आमच्यावर दबाव होता. फलंदाजी करताना कठीण परिस्थितीतही खेळाडूंनी उत्तम कामगिरी केल्यामुळे भारतीय संघाने ठेवलेल्या ४६८ धावांचं लक्ष्य पार करताना दमछाक झालेल्या वेस्ट इंडीजचा डाव २१० धावांवर आटोपला आहे. भारताकडून रवींद्र जाडेजा आणि मोहम्मद शमीनं प्रत्येकी तीन, तर इशांत शर्मानं दोन विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराहने एक विकेट घेतली. विराटनं विजयाचे श्रेय संघाला दिले आहे. कर्णधाराच्या रुपानं तुमच्या नावासमोर फक्त ‘सी’ हे अक्षर जोडलं जाते. पण उर्वरित संघ सहकारी सामुहिक कामगिरी करतात, असे ही कोहली यावेळी म्हणाला.