मलिंगाने सर्वाधिक विकेट्सचा रचला इतिहास

malinga

 

मुंबई वृत्तसंस्था । श्रीलंकेचा अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला सर्वाधिक विकेट्स घेणारा जगातला पहिला गोलंदाज ठरला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मलिंगाने दि.1 सप्टेंबर रविवार रोजी पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळताना हा इतिहास रचला. मात्र हा सामना न्यूझीलंडने पाच गडी राखून जिंकला आहे. मलिंगाने सर्वाधिक विकेट्सच्या बाबतीत पाकिस्तानचा गोलंदाज शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडला. आफ्रिदीने आपल्या टी-२० करिअरमध्ये ९९ सामन्यांमध्ये एकूण ९८ विकेट्स घेतले. आता टी-२० चा कर्णधार मलिंगाचे ७४ सामन्यांमध्ये ९९ विकेट्स झाले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात लसिथ मलिंगाने २३ धावा देऊन २ गडी बाद केले. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या मलिंगाने या टी-२० सामन्यात पहिल्या षटकातच कोलिन मुनरोची विकेट काढत आफ्रिदीच्या विक्रमाची बरोबरी केली. त्यानंतर त्याने ग्रँडहोमला बाद करत आपल्या ७४ व्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यान नवा विक्रम केला.

Protected Content