जळगाव प्रतिनिधी । घरकुल घोटाळ्यातील सर्व आरोपींना जामीन मिळण्यात मोठ्या अडचणी येण्याची शक्यता आहे.
जळगाव नगरपालिका घरकुल घोटाळ्यातील 48 आरोपींना जामीन मिळण्यासाठी मोठी कसरत होणार आहे. कारण न्यायालयाने सर्व आरोपींना शिक्षेसह मोठा दंड ठोठावला आहे. त्यामुळे आरोपी ज्यावेळेस जामीनासाठी अर्ज करतील त्यावेळेस सरकारपक्ष आरोपींनी आधी दंड भरावा मगच जामीन देण्यात यावा, अशी भूमिका घेणार आहे. त्यामुळे आरोपींना जामीन मिळविण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. सरकार पक्ष दंड भरण्यासाठी आग्रही असणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांनी माहिती दिली दिली.