जळगाव प्रतिनिधी । औरंगाबाद आणि चिखल ठाणा येथील पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यातील दोघा आरोपींना जळगाव शहरात संशयितरित्या फिरत असतांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. लक्ष्मण संतोष जाधव (वय-23) रा. तांबापूर आणि राजेश अशोक कोळी (वय-२० वर्ष) रा. जोशीपेठ असे संशयितांचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एलसीबीचे पोलीस निरीक्षक बापू रोहम, स्थानिक गुन्हे पोलीस पो.कॉ. विजय शामराव पाटील व सचिन महाजन हे एमआयडीसी पोलीसांच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असतांना संशयासपद स्थितींत एक तरूण भरधाव वेगाने पळून जात असतांना संशयित आरोपी लक्ष्मण जाधव याला थांबविले. त्याच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्यानंतर ताब्यातील मोटारसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. ही मोटारसायकल चिखल ठाणा पोलीस स्टेशनला भाग ५ गुरनं. २९४/२०१९ भादवि ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. यातील संशयित आरोपी लक्ष्मण जाधव याला तांबापुरा भागात नाकाबंदी करून तर राजेश कोळी याला जुने बी.जे.मार्केट परिसरातून अटक केली आहे. दोघांकडून चोरीच्या दोन मोटारसायकल जप्त केल्या आहेत.
यांनी केली कारवाई
पोकॉ. विजय शामराव पाटील व सचिन महाजन पाठलाग करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखेत फोन करून स.फौ. अशोक महाजन, सुनील दामोदरे, विलास पाटील, इंद्रिस पठाण, प्रकाश महाजन, भगवान पाटील, नंदलाल पाटील, राजेंद्र का पाटील, गफूर तडवी, महेश पाटील अशाना तात्काळ बोलवून तांबापुरा भागात व जुने बी.जे.मार्केट परिसरात सापळा रचून दोघांना अटक करून दोघांच्या ताब्यातील दोन दुचाकी जप्त करण्यात आले आहे.