धुळे, विशेष प्रतिनिधी | जळगाव नगर पालिकेच्या घरकुल घोटाळ्याचा आज (दि.३१) धुळे येथील न्यायालयात निकाल देण्यात येणार असून त्यासाठी घोटाळ्यातील सगळे हयात असलेले आरोपी आज न्यायालयात हजर झाले आहेत. त्यापैकी सौ पुष्पा पाटील यांना औरंगाबाद येथून रूग्णवाहिकेतून न्यायालयात आणण्यात आले आहे. खटल्याचे कामकाज सुरू झाले आहे.
त्यामध्ये माजी मंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर, यांच्यासह तत्कालीन नगरसेवक असलेले सगळे जळगाव मनपाचे विद्यमान नेते असे ४८ जण धुळे यथील न्यायालयात हजर आहेत. निकालाच्या अनुशंगाने आज न्यायालय परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. याप्रकरणी कोणत्याही क्षणी निकाल येण्याची शक्यता संपूर्ण राज्यात त्याबद्दल उत्सुकता लागून आहे. सगळ्या नेत्यांच्या समर्थकांनी न्यायालय परिसरात गर्दी केली आहे.