जळगाव प्रतिनिधी । दुग्धजन्य पदार्थांसाठी ख्यात असणार्या शहरातील दत्त डेअरी ( जुनी ) येथे सर्व प्रकारच्या मिठाई उपलब्ध असून यात पारंपरीक गुणवत्तेला शुध्दतेची जोड देण्यात आल्याने ग्राहकांची पसंती मिळाली आहे.
सध्या सणासुदीचे दिवस तोंडावर आले असून साहजीकच विविध प्रकारच्या मिठायांच्या खरेदीचे नियोजनदेखील सुरू झालेले आहे. सध्या जळगावात मिठाईसाठी विविध पर्याय उपलब्ध असले तरी प्रत्येक दुकानात शुध्द स्वरूपातील मिठाई मिळेलच याची गॅरंटी नाही. विशेष करून काही दुकांनांमधील सिंथेटीक मावा तसेच अन्य केमिकल पदार्थांनी युक्त असणार्या मिठाया घेण्याऐवजी शुध्द आणि सात्वीक स्वरूपातील मिष्ट पदार्थ घेणे केव्हाही उत्तमच. मात्र….हे शुध्द पदार्थ नेमके मिळतात तरी कुठे ? असा आपल्याला प्रश्न पडेल….तर यासाठी जळगावातील दत्त डेअरी (जुनी) हा उत्तम पर्याय आपल्यासमोर येतो. सन १९३२ पासून जळगावकरांच्या सेवेत असणार्या दत्त डेअरी जुनीमध्ये सर्व प्रकारच्या शुध्द स्वरूपात तयार करण्यात आलेल्या मिठाया माफक दरात उपलब्ध आहेत.
जळगाव येथील दत्त डेअरीला (जुनी) सेवेचा वारसा आहे. १९३२ साली स्थापन झालेल्या या डेअरीच्या व्यवसायात राणे कुटुंबातील आज तिसरी पिढी सांभाळत असून चौथी पिढीदेखील सूत्रे सांभाळण्यासाठी सज्ज झालेली आहे. दत्त डेअरी (जुनी)चे वैशिष्ट्य म्हणजे येथील सर्व उत्पादने ही शुध्द स्वरूपात ग्राहकांना सादर करण्यात येतात. डेअरीमार्फत दुग्ध उत्पादकांकडून दुधाचे थेट संकलन करण्यात येऊन स्वमालकीच्या युनिटमध्ये यावर प्रक्रिया करण्यात येतात. यामुळे गुणवत्ता आणि शुध्दता ही आमची खासियत असल्याची माहिती डेअरीचे संचालक नितीन राणे यांनी लाईव्ह ट्रेंडस् न्यूजशी बोलतांना दिली. ते पुढे म्हणाले की, दुध, दही, तूप, ताक, लोणी आदींसारख्या उत्पादनांसाठी दत्त डेअरी (जुनी) ख्यातनाम आहेच. याच्या जोडीला मावा, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, बासुंदी, रबडी आदींसारख्या प्रॉडक्टलाही जळगावकरांची पसंती मिळाली आहे. तर याच्या जोडीला मिठाईचे विविध प्रकारदेखील ग्राहकांना सादर करण्यात आलेले आहेत. यात पेढे, शुध्द तुपातील लाडू, विविध फ्लेवर्सच्या बर्फी, काजू कतली, अंजीर कतली, रसगुल्ले आदींचा समावेश आहे. सर्व मिठायांसाठी लागणारे पदार्थ हे शुध्द स्वरूपातील असून यातील अन्य घटक हे अन्न व औषधी प्रशासनाने ठरवून दिलेल्या मानकानुसारच असल्याची माहिती नितीन राणे यांनी दिली. जळगावकरांनी आजवर दत्त डेअरी (जुनी)ला भरभरून प्रतिसाद दिला असून हे प्रेम अद्याप कायम असल्याचे आवर्जून नमूद केले.
संपर्क – दत्त डेअरी जुनी, स्टेशन रोड जळगाव
गुगल मॅप्सवर पहा अचूक लोकेशन.
पहा : दत्त डेअरी ( जुनी ) बाबतचा हा वृत्तांत