Home Cities जामनेर राजेंद्र सोनवणे ‘पद्मा अवार्ड २०१९’ ने सन्मानित

राजेंद्र सोनवणे ‘पद्मा अवार्ड २०१९’ ने सन्मानित


padma award 2019

जामनेर, प्रतिनिधी | येथील ज्ञानगंगा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र जगन्नाथ सोनवणे यांनी ‘माझे सरकार’ या ऑनलाईन वेबसाईटवरील प्रश्नमंजुषेत ९० सेकंदात १० प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली. त्याबद्दल त्यांना ‘पद्मा अवार्ड २०१९’ या पुरस्काराने मुंबई येथे नुकतेच सह्याद्री अतिथी गृहावर ना. गिरीश महाजन यांच्याहस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरवण्यात आले.

 

त्यावेळी तालुका एज्युकेशन सोसायटी जामनेर संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष, सचिव, सर्व संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


Protected Content

Play sound