पाक कमांडो समुद्रमार्गे भारतात घुसण्याची भीती ; गुजरातमध्ये हायअलर्ट

6 terrorists entered in tam

 

अहमदाबाद (वृत्तसंस्था) गुप्तचर यंत्रणांनी पाकिस्तानी कमांडो समुद्रामार्गे भारतात कछ परिसरातून घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे गुजरातमधील सर्व बंदरांवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

गुजरातमधील कांडलामध्ये कच्छमार्गे पाकिस्तानी कमांडो किंवा दहशतवादी घुसखोरी करणार असल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे. या माहितीनंतर सीमा सुरक्षा दल, भारतीय तटरक्षक दल आणि इतर सुरक्षा यंत्रणांसाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाकिस्तानमधून समुद्रमार्गे येत हे कमांडो किंवा दहशतवादी धार्मिक हिंसाचार निर्माण करण्याचा किंवा दहशतवादी हल्ले करण्याचा प्रयत्न करतील अशी माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे. त्यामुळे तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Protected Content