Home Cities पाचोरा आमदार किशोर पाटील मांडणार विकासाचा लेखाजोखा

आमदार किशोर पाटील मांडणार विकासाचा लेखाजोखा

0
38


पाचोरा प्रतिनिधी । आमदार किशोर पाटील आपल्या कारकिर्दीतील आजवरच्या विकासकामांचा लेखाजोखा जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर करणार आहेत.

शिवसेनेतर्फे ३ फेब्रवारी रोजी जनसंवाद कार्यक्रमाचे येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर दुपारी ४ वाजता आयोजन केले आहे असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी शिवसेना कार्यालयात झालेल्या पत्रपरिषदेत दिली. या कार्यक्रमास माजी आमदार आर. ओ. पाटील, निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या चेअरमन वैशाली सूर्यवंशी, सचिव नरेंद्र सूर्यवंशी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात थेट जनतेशी सुसंवाद साधला जाईल. त्यांच्या अडचणी देखील समजून त्या सोडवण्याला प्राधान्य राहणार असल्ययाचे आमदार किशोर पाटील म्हणाले.

याप्रसंगी नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य पदमसिंग पाटील, अ‍ॅड. दिनकर देवरे, गणेश पाटील, नगरसेवक सतीश चेडे, आनंद पगारे, अ‍ॅड. राजेंद्र परदेशी आदी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound