Home क्राईम देशी पिस्तुलासह चोरट्यास अटक

देशी पिस्तुलासह चोरट्यास अटक

0
43

चोपडा प्रतिनिधी । स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने एका चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून पाच मोटारसायकलींसह देशी पिस्तुल जप्त करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, तरुण चोरीची मोटारसायकल वापरत असल्याची आणि त्याच्या ताब्यात एक बनावट पिस्टल असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे बी. जी. रोहम यांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र बागुल, नाईक सुरज पाटील, दादाभाऊ पाटील, योगेश वराडे, दीपक पाटील, प्रवीण हिवराळे आदींच्या पथकाने तपास सुरू केला. यानंतर राहुल सुरेश कोळी (वय २३, रा वरवाडा, ता. शिरपूर) या तरुणाला काळ्या रंगाच्या फॅशन प्लस गाडीवर पकडले. त्याची पोलिसांनी झाडाझडती घेतली असता त्याच्या कंबरेला एक देशी बनावटीचे पिस्तूल सापडले. त्याला ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound