Home राजकीय केजरीवाल सरकारकडून पाणी बीलाची थकबाकी माफ

केजरीवाल सरकारकडून पाणी बीलाची थकबाकी माफ


arvind kejriwal
 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीतील नागरिकांकडे असलेल्या पाणी बीलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच केजरीवाल यांनी दिल्लीतील नागरिकांचे वीज बील माफ केले होते.

 

दिल्लीतील केजरीवाल सरकारने नागरिकांना मोठी भेट दिली आहे. नवीन तंत्रज्ञामुळे जुन्या बिलांसंदर्भातील अनेक अडचणी समोर आल्या आहेत. विना रिडींगही नागरिकांना बील आल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच केजरीवाल यांनी दिल्लीतील नागरिकांचे वीज बील माफ केले होते. 200 युनिट वीज वापणाऱ्या नागरिकांचे लाईट बील माफ करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला होता. त्यानंतर, आता पाणी बीलची थकबाकीही माफ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


Protected Content

Play sound