काश्मीरप्रश्नी पाकिस्तान एकाकी – इम्रान खानची कबुली

TH10PAKISTANIMRANKHAN

इस्लामाबाद, वृत्तसंस्था | जम्मू-काश्मीरचा मुद्दा मी जगातील सर्वच मंचावर उपस्थित केला. संयुक्त राष्ट्रांपासून मुस्लिम राष्ट्रांकडेही गेलो. पण त्यात यश आले नाही. आज आपल्याला कोणीच साथ देत नाही, असे हताश उद्गार काढतानाच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान याने आण्विक युद्धाची धमकीही दिली.
दोन्ही देशांकडे अण्वस्त्र आहेत पण अशा युद्धाने काहीच हाती लागणार नाही. जर युद्ध झाले तर दोन्ही देशांसह जगाचाही नायनाट होईल. आम्ही काश्मीरसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो, असा पोकळ इशारा इम्रानने दिला.

 

फ्रान्समध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. यावेळी मोदींनी जम्मू-काश्मीरचा प्रश्न हा द्विपक्षीय चर्चेचा विषय आहे. तिसऱ्या पक्षाने त्यात लक्ष देण्याची गरज नसल्याचे ट्रम्प यांना स्पष्ट सांगितले. ट्रम्प यांनीही मोदींचं हे म्हणणे मान्य केल्यानंतर इम्रान खान यांनी पाकिस्तानी जनतेशी संवाद साधताना त्यांचा हताशपणा जाहीर करतानाच आण्विक युद्धाची भीती व्यक्त करून असा हल्ला करण्याची भारताला धमकीच दिली.

काश्मीरचा अमेरिका आणि अन्य बड्या राष्ट्रांसमोर उपस्थित केला जाईल. संयुक्त राष्ट्राची या संदर्भात बैठक झाल्यानेच हा प्रश्न आता आंतरराष्ट्रीय समस्या झाला आहे. त्यामुळे या मुद्द्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष केंद्रीत झाले आहे, असेही तारे इम्रानने तोडले. आज जगभरातील देश आणि मुस्लिम राष्ट्रही मजबूरीने आपल्याला साथ देत नाहीत. मात्र काळानुसार ते आपल्याला मदत करतील, असे सांगतानाच संपूर्ण जगात आम्ही काश्मीरचे ब्रँड अॅम्बेसिडर बनणार आहोत. २७ सप्टेंबरला पुन्हा यूएनमध्ये हा मुद्दा उचलण्यात येणार असल्याचेही त्याने म्हटले.

संयुक्त राष्ट्रावर टीका :- संयुक्त राष्ट्राने कमकुवतांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. पण इथे तर यूएन नेहमीच बलशाली देशांच्या पाठी उभे राहताना दिसत आहे, अशी टीका करतानाच दोन्हींकडे अण्वस्त्र आहेत. जर युद्ध झाले तर दोन्ही देशांसह जगाचाही नायनाट होईल.

दर आठवड्याला इव्हेंट :- काश्मीरप्रश्नी संपूर्ण पाकिस्तानात दर आठवड्याला शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांमध्ये इव्हेंट करण्यात येणार आहेत. येत्या शुक्रवारी १२ ते १२.३० दरम्यान लोक रस्त्यावर उतरतील, असेही त्याने सांगितले.

Protected Content