Home धर्म-समाज मुंबईत दहीहंडीचा जल्लोष ; ५१ गोविंदा जखमी

मुंबईत दहीहंडीचा जल्लोष ; ५१ गोविंदा जखमी


hqdefault 2

मुंबई (वृत्तसंस्था) आज मुंबईत दहीहंडीचा जल्लोष बघावयास मिळाला. दरम्यान, विविध भागातील पथकांतील एकूण ५१ गोविंदा आज दहीहंडी फोडताना जखमी झाले आहेत.

 

विविध दहीहंडीमध्ये जखमी गोविंदांपैकी २४ गोविंदांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या गोविंदांची प्रकृती स्थिर असून आतापर्यंत २७ गोविंदांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, मुंबई-ठाण्यातल्या दहीहंडी उत्सवावर यंदा पश्चिम महाराष्ट्रातल्या पुराचं सावट पाहायला मिळाले. दरवर्षी मोठ्या सिनेकलाकारांच्या उपस्थितीत मोठ्या धामधुमीत होणारा हा उत्सव यंदा साधेपणाने साजरा कऱण्यात आला.


Protected Content

Play sound