धरणगाव प्रतिनिधी ।मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेनिमित्त जिल्ह्यात दाखल झाले असून आज सकाळी पारोळा, अमळनेर आणि आता मुख्यमंत्री धरणगावात पोहचले आहेत.
याआधी महाजनादेश यात्रा रद्द करण्यात आली होती. या पार्श्वभूमिवर, आज ही यात्रा जिल्ह्यात दाखल झाली आहे. आज सकाळी पारोळा व अमळनेर येथे महाजनादेश यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. याप्रसंगी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार शिरीष चौधरी, आमदार स्मिता वाघ, माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील,पारोळ्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार आदींसह अन्य नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
धरणगाव येथे मुख्यमंत्र्यांचे स्वागत झाले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष संजय महाजन,पीसी पाटील,शिरीष बयस,पालिका गटनेते कैलास माळी यांच्यासह नगरसेवक,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस हे जळगाव, भुसावळ आणि जामनेर येथे सभा घेणार आहेत.
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/2489219808024528/