शेअर बाजारात घसरण

Sensex

मुंबई प्रतिनिधी । भारतीय शेअर बाजारामध्ये आज दि. 23 ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. सकाळी बाजार उघडताच सेंसेक्स 307 अंकांनी कोसळला असून सेंसेक्स गेल्या पाच महिन्यांतील सर्वात निचांकावर पोहोचला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि.22) गुरुवार रोजीसुद्धा शेअर बाजारात मोठी पडझड झाली होती. तसेच रुपयाही खूप गडगडला होता. ही पडझड होत असतांनाच सोन्याचा दर मात्र वाढला. गुरुवारी शेअर बाजाराचा निर्देशांक ३६,४७२.९३ अंकावर खाली आला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १७७.३५ अंकांनी घसरून १०,७४१.३५ अंकावर बंद झाला होता. रुपयाही २६ पैशांनी घसरल्याने एक डॉलरची किंमत ७१.८१ रुपये झाली होती. हा रुपयाचा आठ महिन्यांचा नीचांक ठरला होता. या साऱ्या पार्श्वभूमीवर सोने १५० रुपयांनी वाढून ३८,९७० रुपये प्रति १० ग्रॅम झाले तर चांदीही ६० रुपयांनी वाढून ४५,१०० रुपये किलो झाली होती. दरम्यान, आज रुपयाच्या मूल्यामध्येही घसरण दिसून आली असून, एक डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 72.03 पर्यंत घसरले आहे.

Protected Content