मुंबई (वृत्तसंस्था) कोहिनूर मील गैरव्यवहार प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मागील सात तासापासून सुरु असलेली ईडी कार्यालयातील चौकशी पूर्ण झाली आहे. आत राज कोणत्याही क्षणी इडी कार्यालयातून बाहेर येणार पडणार आहेत.
मागील सात तासांपासून राज ठाकरेंची ईडीकडून चौकशी सुरू आहे. ईडीच्या या कारवाईमुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मनसेने ठाणे बंदचे आवाहन केले होते. तसेच अनेक कार्यकर्ते चौकशीवेळी राज यांच्यासोबत ईडीच्या कार्यालयात हजर राहणार होते, मात्र राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर बंद मागे घेण्यात आला. दरम्यान ,राज ठाकरे काही क्षणातच ईडीच्या कार्यालयाबाहेर येणार पडणार आहेत.
सौजन्य : बीबीसी मराठी
https://www.facebook.com/BBCnewsMarathi/videos/2353621094720027/