श्रीहरीकोटा वृत्तसंस्था । भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रोच्या अतिशय महत्वाकांक्षी अशा चांद्रयान-२ या यानाने आज चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे.
आज सकाळी चांद्रयान २ ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. यामुळे चांद्रयान-२ हे ११८ किलोमीटर एपोजी (चंद्रापासून कमी अंतरावर असलेला) आणि १८०७८ किलोमीटरच्या पेरीजी (चंद्रापासून दूर अंतरावरील) अंडाकृती कक्षेत २४ तास प्रदक्षिणा घालणार आहे. यादरम्यान चांद्रयान -२चा वेग १०.९८ किमी प्रतिसेकंदवरून कमी करून १.९८ किमी प्रतिसेकंद करण्यात येणार आहे. चांद्रयान २ हे चंद्राच्या कक्षेत शिरण्याची कामगिरी ऐतिहासीक अशीच आहे.