नवी दिल्ली वृत्तसंस्था । गरीब सवर्णांच्या आरक्षणाला स्थगिती देण्यासाठी आज न्यायालयाने नकार दिला आहे.
केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच गरीब सवर्णांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. लोकसभा व राज्यसभेत हे विधेयक संमत करण्यात आले असून यावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरीदेखील केली आहे. दरम्यान, या आरक्षणाला स्थगिती द्यावी अशी मागणी करण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. याला आज न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच या याचिकेवरील सुनावणी आता चार आठवण्यांनी घेण्यात येणार आहे.