जळगाव प्रतिनिधी । येथील गांधी रिचर्स फाऊंडेशनतर्फे २९ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता भैय्यासाहेब गंधे नाट्यगृहात महादेव भाई या नाटकाचा प्रयोग होणार आहे.
गांधी रिसर्च फाऊंडेशन बा-बापू १५० अंतर्गत विविध उपक्रम राबवत आहे. त्याच्या भाग म्हणून रमेश भोळे दिग्दर्शित महादेव भाई नाटकाचे सादरीकरण केले जाणार आहे. गांधींजींसोबत स्वीय साहाय्यक म्हणून महादेव भाई संपूर्ण आयुष्यभर होते. महादेव भाई समक्ष गांधीजींबद्दल जे-जे घडले ते-ते सर्व त्यांनी त्यांच्या रोजनिशीमध्ये नोंदवले आहे. ज्या दिवशी बापूंसोबत ते नव्हते, त्या दिवसाची पाने त्यांनी कोरी सोडली आहेत. अशा २७ ते २८ डायर्या त्यांनी लिहिल्या आहेत. या रोजनिशीच्या आधारे प्रसिद्ध लेखक रामू नामनाथन यांनी इंग्रजी भाषेत हे नाटक लिहले आहे. एकपात्री असलेल्या या प्रयोगाचे मराठी भाषेत माया पंडीत यांनी अनुवाद केला. जळगावातील नाटककार, लेखक, रमेश भोळे यांनी बहुपात्री नाट्यप्रयोगाची निर्मिती केली असून सर्वांना प्रवेश खुला ठेवण्यात आला आहे. रसिकांनी याचा लाभ घेण्याची आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशन व ओम थिएटर यांनी केले आहे.