जम्मू काश्मीर (वृत्तसंस्था) कलम ३७० हटवल्यानंतर आज (शनिवार) पुन्हा एकदा पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे. आज, शनिवारी पहाटे साडेसहा वाजता पाकिस्तानी सैन्याने राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर तुफान गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला. गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. या चकमकीत जवान लान्स नायक संदीप थापा (वय ३५) शहीद झाले. थापा हे देहरादूनचे असून, १५ वर्षांपासून ते लष्करी सेवेत होते.