Home क्राईम कन्नड घाटात ट्रकने घेतला पेट

कन्नड घाटात ट्रकने घेतला पेट

0
88

ड्रायव्हर व क्लिनर गंभीर जखमी

चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव औरंगाबाद हायवेवर कन्नड घाटामध्ये आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास औरंगाबाद कडून चाळीसगाव कडे येणार्‍या ट्रकला अपघात होऊन लाग लागल्याची घटना घडली.

ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने समोरील गाडी चुकवीत असताना घाटाकडे खडकाला लागलेल्या मोठ्या धक्क्याने ट्रकची डिझेल टाकी फुटून पेट घेतल्याने संपूर्ण ट्रक आगीने वेढल्यामुळे जळून खाक झाला आहे. यातील ड्रायव्हर व क्लिनर गंभीर जखमी असून त्यांना चाळीसगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अंधार असल्याने अधिक जखमींचा शोध घेण्याची मोहीम महामार्ग पोलिसांनी सुरू केली आहे. दरम्यान, चाळीसगाव नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. ही आग ताबडतोब आटोक्यात न आल्यास डोंगराला देखील आग लागण्याची शक्यता आहे यामुळे अधिक खबरदारी घेतली जात असल्याचे दिसून येत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound