Home क्राईम गणपतीपुळे येथील समुद्रात तीन पर्यटक बुडाले

गणपतीपुळे येथील समुद्रात तीन पर्यटक बुडाले


images 1528113187396 drowning in flood
 

रत्नागिरी (वृत्तसंस्था) गणपतीपुळे येथील समुद्रात तीन पर्यटक बुडाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली आहे. बुडालेले तिघेही कोल्हापूर येथील रहिवासी आहेत. दोन महिलांचे मृतदेह सापडले असून सुरक्षारक्षकांकडून आणखी एकाचा शोध सुरु आहे. दरम्यान, हे सर्व जण कोकणात पर्यटनासाठी आले होते.

 

कोल्हापूरमधील कसबा बावडा येथील काजल जयसिंग मचले (१८), सुमन विशाल मचले (२३) आणि बागडे (२७) ही सर्व जण आज पहाटे गणपतीपुळे येथील मंदिरात दर्शन घेऊन समुद्र पाहण्यासाठी किनाऱ्यावर गेले. यावेळी सर्वजण पाण्यात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते समुद्रात ओढले गेलेत. तिघांपैकी काजल आणि सुमन यांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर बागडे हा बेपत्ता आहे. त्यांच्यासोबत आणखी काही तरुण तरुणीही होत्या. त्यांना वाचविण्यात यश आले आहे. चार जणांना सुरक्षा रक्षकांनी समुद्रातून सुरक्षित बाहेर काढले .


Protected Content

Play sound