Home Cities जळगाव डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली नगरसेवकाची मुलाखत

डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली नगरसेवकाची मुलाखत


जळगाव झेंडावंदन बातमी

जळगाव प्रतिनिधी । डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात 13 ऑगस्ट रोजी शालेय उपक्रमांतर्गत तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी प्रभाग क्रमांक 12 चे नगरसेवक अनंत जोशी यांची मुलाखत घेतली.

यावेळी विविध प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले ,आपण प्रभागातील कामे काशी सोडवतात, कोण कोण ती कामे करतात, आपल्या स्वप्नातला वार्ड कसा आहे, महापौर झाल्यास काय कामे करणार, शहरातीळ रस्ते इतके खराब का आहे आदी प्रश्नांची उत्तरे नगरसेवक अनंत जोशी यांनी दिलखुलास उत्तर दिली.

विद्यार्थ्यांना स्थानिक शासन संस्था यांची माहिती मिळावी महापालिका व नगरसेवक यांची कामे समजावी म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका योगिता शिंपी यांच्या संकल्पनेतून या प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद इसे यांनी तर परिचय पूजा साळवी यांनी करून दिला. याप्रसंगी केतन वाघ, योगेश जोशी यांच्यासह आदी उपस्थिती होते.


Protected Content

Play sound