Home Cities जळगाव गरजू विद्यार्थ्यांना वह्यावाटप करून केला वाढदिवस साजरा

गरजू विद्यार्थ्यांना वह्यावाटप करून केला वाढदिवस साजरा


notebook

जळगाव, प्रतिनिधी | केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष विकास अरुण रणधीर यांनी आपला वाढदिवस आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला.इयत्ता पहिलीमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या गरीब व हुशार अशा सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी दुरेघी व चौकटीच्या वह्यांचे त्यानिमित्ताने वाटप केले.

 

वाढदिवसानिमित्त एका चांगल्या कार्याला हातभार लावावा व गरीब विद्यार्थ्यांना काही मदत करून त्यांचे शैक्षणिक बाबतीत सहकार्य करावे, या हेतूने त्यांनी हा उपक्रम केला. त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक आनंदित झाले. त्यांनी मनापासून रणधीर यांचे आभार मानले. सगळयांनी अशाच प्रकारे काहीतरी समाजकार्य करून वाढदिवस अन्य महत्वाचे दिवस साजरे करावेत, अशी अपेक्षा मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी पालक-शिक्षक संघाचे सर्व सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound