Home Cities जारगाव चौफुलीनजीक पाण्याची नासाडी

जारगाव चौफुलीनजीक पाण्याची नासाडी

0
79

पाचोरा प्रतिनिधी । जारगाव चौफुलीजवळ व्यंकट गोपाल मंगल कार्यालयासमोरून गेलेल्या जलवाहिनीच्या उभ्या व्हॉल्व्ह मधून हजारो लिटर पाणी बाहेर पडून पाण्याची नासाडी होत आहे.

सध्या सर्वत्र पाणीटंचाईचा सामना करण्याचा बिकट प्रसंग ओढवला आहे. पाचोरा शहरात गेल्या महिनाभरापासून पाणीपुरवठा ठप्प होता आता गिरणा धरणातून आवर्तन मिळाल्याने पाणीपुरवठा पाच दिवसाआड सुरळीत होत आहे. असे असताना जारगाव चौफुलीवरील जलवाहिनीच्या व्हॉल्व्ह मधून हजारो लिटर पाणी बाहेर पडून त्याची नासाडी होत आहे. यासंदर्भात संबंधित यंत्रणेने गांभीर्याने दखल घेऊन पाण्याची गळती थांबवावी याकडे दुर्लक्ष करणार्‍यांना शासन करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound