Home Uncategorized  जिल्हा बँक नवनिर्वाचित संचालिका जयश्री पाटील यांचा साधेपणाने वाढदिवस; शुभेच्छांसाठी हितचिंतकांची रीघ

 जिल्हा बँक नवनिर्वाचित संचालिका जयश्री पाटील यांचा साधेपणाने वाढदिवस; शुभेच्छांसाठी हितचिंतकांची रीघ

0
1


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित संचालिका, माजी जिल्हा परिषद सदस्या आणि माजी नगराध्यक्षा जयश्रीताई अनिल पाटील यांचा वाढदिवस माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. तालुक्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून शेतकऱ्यांच्या मदतीचा हात देण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत हा सोहळा साधेपणाने पार पडला, मात्र दिवसभरात विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.

अमळनेर तालुक्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीच्या वतीने कार्यकर्त्यांना विनम्र आवाहन करण्यात आले होते. वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून तो निधी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरण्यात यावा, अशी ठाम भूमिका पक्षाकडून मांडण्यात आली होती. या आवाहनाला सर्व स्तरांतून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि सोहळ्याचे स्वरूप साधे ठेवण्यात आले.
जयश्रीताई पाटील यांनी नेहमीच सामाजिक कार्याला प्राधान्य दिल्यामुळे त्यांच्यावरील प्रेमापोटी दिवसभर शेकडो हितचिंतक व कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. जळगाव जिल्हा बँकेत अमळनेर तालुक्यातून पहिल्यांदाच जयश्री पाटील यांच्या रूपाने एका महिला संचालकाची बिनविरोध निवड झाल्याबद्दलही उपस्थितांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

रात्री उशिरापर्यंत निवासस्थानी शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी सुरू होती. यामध्ये महायुतीसह विविध पक्षांचे पदाधिकारी, आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, शेतकी संघ, फ्रुटसेल आणि मार्केटचे पदाधिकारी, गावचे सरपंच, विकासोचे पदाधिकारी, पोलिस पाटील, आजी-माजी नगरसेवक, सामाजिक व व्यापार क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी बांधव, महिला भगिनी आणि युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्यासह जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते व विविध पदाधिकाऱ्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून जयश्रीताई पाटील यांना वाढदिवसाच्या व नवनिर्वादाच्या शुभेच्छा दिल्या.

Protected Content

Play sound