जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिवसरात्र कष्ट करून प्रवाशांची सेवा करणाऱ्या रिक्षाचालक-मालकांनी कार्तिक पौर्णिमेचे औचित्य साधत सामाजिक आणि धार्मिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविला. वीर सावरकर रिक्षा युनियनचे अध्यक्ष दिलीप भाऊ सपकाळे यांच्या पुढाकाराने गोशाळेत गायींना पोषक हिरव्या भाजीपाल्याचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी स्वतःच्या हाताने गायींना भाजीपाला खाऊ घालत गोसेवा केली. या उपक्रमामुळे गोशाळेच्या परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
या सेवाभावी उपक्रमाला वीर सावरकर रिक्षा युनियनचे अध्यक्ष दिलीप भाऊ सपकाळे, युनियनचे रिक्षाचालक, स्वर कराओके म्युझिकल ग्रुपचे अध्यक्ष बापूसाहेब पाटील, रमेश पैलानी, हेमंत बारी आणि सुनीलभाऊ चौधरी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत गायींना हिरवा भाजीपाला खाऊ घातला. कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने गोमातेची सेवा करण्याचा आनंद उपस्थितांनी व्यक्त केला. या उपक्रमात सोमनाथ पाटील यांनी गोठ्यात बासरीवादन केले. त्यांच्या बासरीच्या सुरांनी गोशाळेतील वातावरणात भक्तिभावाची ऊर्जा निर्माण झाली. गोसेवा आणि संगीताचा सुंदर संगम यावेळी अनुभवायला मिळाला. उपस्थितांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

यावेळी स्वर कराओके ग्रुपचे हेमंतभाऊ बारी, सुनीलभाऊ चौधरी, रिक्षा युनियनचे चालक दिलीप वाघ, शांताराम पाटील, बाबा चौधरी, अशोक महाजन, सोपान भोळे, मिलिंद सोनवणे, संदीप सोनवणे, भूषण नाईक, प्रेमचंद चौधरी, अशोक सपकाळे, दगडू सपके, रमेश सोनार, भास्कर ठाकूर, एकनाथ बारी, पोपट बाबा, शशिकांत जाधव, शेख साहेब पीएसआय आणि सुनील जोशी यांच्यासह अनेक बांधव उपस्थित होते. गोसेवेच्या कार्यात सातत्याने योगदान देणारे गोसेवक ॲड. विजय कांबरा यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. बापूसाहेब पाटील, दिलीपभाऊ सपकाळे, हेमंत बारी, रमेश पैलानी तसेच उपस्थित रिक्षाचालक-मालकांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. गोसेवेच्या चांगल्या कार्याबद्दल त्यांचे आभार मानत उपस्थितांनी त्यांना धन्यवाद दिले.



