Home Cities अमळनेर निम शिवारात हिंस्र प्राण्याचा वासरावर हल्ला; तीन वर्षीय वासरू ठार!

निम शिवारात हिंस्र प्राण्याचा वासरावर हल्ला; तीन वर्षीय वासरू ठार!

0
5

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील निम शिवारात एका हिंस्र प्राण्याने तीन वर्षीय वासरावर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. अमळनेर येथील डॉ. संदीप जोशी यांच्या शेतात सुरू असलेल्या गोशाळेच्या आवारात ही घटना घडली.

डॉ. जोशी यांच्या मालकीच्या शेतात निम येथील शेतकरी सुदाम पाटील हे काम पाहतात. दुसऱ्या दिवशी ते शेतात आले असता त्यांना वासरू मृतावस्थेत आढळले. यानंतर त्यांनी तातडीने अमळनेर वनविभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

दरम्यान, वनपाल गुलाब पिंजारी यांनी घटनास्थळी पाहणी करून वासरावर हल्ला करणारा प्राणी बिबट्या नसून ‘तळस’ हा हिंस्र प्राणी असल्याचे सांगितले. प्राण्याच्या पायाच्या ठशांवरून हा निष्कर्ष काढण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शेतकरी बांधवांनी रात्रीच्या वेळी शेतात ये-जा करताना काळजी घ्यावी. परिसरात बिबट्या असल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही वनविभागाकडून करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound