Home Cities जळगाव कबचौउमविचे माजी कुलगुरू डॉ. आर.एस. माळी कालवश !

कबचौउमविचे माजी कुलगुरू डॉ. आर.एस. माळी कालवश !

0
7

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचे माजी कुलगुरू डॉ. आर.एस. माळी यांचे आज वृध्दापकाळाने निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

प्रा. डॉ. राघो शिवराम उर्फ आर.एस. माळी यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचे तिसरे कुलगुरू म्हणून २००१ ते २००६ दरम्यान कार्यभार सांभाळला होता. रसायनशास्त्रात पीएच.डी. केलेल्या माळी यांच्या कार्यकाळात विद्यापीठातील अनेक योजनांना गती आली होती. आज सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर पुणे येथील औंध स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

डॉ. आर.एस. माळी यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रातून संवेदना व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या कार्यकाळाला उजाळा दिला जात आहे.


Protected Content

Play sound