Home Cities पाचोरा पाचोरा तालुका शिवसेना महिला आघाडी मेळाव्याला प्रतिसाद

पाचोरा तालुका शिवसेना महिला आघाडी मेळाव्याला प्रतिसाद


pachora news

पाचोरा प्रतिनिधी । शहरातील आशिर्वाद हॉल येथे घेण्यात आलेल्या पाचोरा तालुका शिवसेना महिला आघाडी मेळाव्या भरपावसात तालुक्यातील महिलांनी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील आशिर्वाद हॉलमध्ये आज दुपारी 2 वाजता झालेल्या महिला मेळाव्यात शिवसेनेच्या शिवशाही विचारांना गावोगावी व घरोघरी पोहचविण्याचा निर्धार यावेळी महिला कार्यकर्त्यांनी केला. ‘महिला शक्ती हिचं उद्या’ची गरज असुन सर्व समस्यांवर लढुन खंबीर उभे राहण्याचा संकल्प यावेळी केला.

यावेळी महिला आघाडी मेळाव्यास शिवसेनेचे आमदार किशोर पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, महिला जिल्हा संघटिका महानंदाताई, महिला आघाडीचे संपर्क प्रमुख अंजली नाईक, महिला आघाडीचे उपजिल्हा संघटिका सुनिताताई पाटील यांच्यासह तालुक्यातील महिला पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound