Home क्राईम मोर नदीवरील पुलाने पुन्हा घेतला बळी; यावल येथील तरूणाचा अपघाती मृत्यू !

मोर नदीवरील पुलाने पुन्हा घेतला बळी; यावल येथील तरूणाचा अपघाती मृत्यू !

0
12

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील अंजाळे गावाजवळ असलेल्या मोर नदीवरील पुलाच्या जीवघेण्या वळणाने पुन्हा एक बळी घेतला असून या अपघातात यावल येथील तरूणाचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी कि,भुसावळ ते यावल दरम्यान अंजाळे गावा जवळील असलेल्या मोर नदीच्या पुलावर दिनांक ३० ऑक्टोबर रोजी दुपारच्या वेळेस यावल येथील शुभम देविदास पाटील वय ३० वर्ष हा तरुण आपल्या कडील मोटरसायकल क्रमांक एम एच १९डीएन२८०९ या दुचाकीने भुसावळकडून यावल येथे येत असतांना त्याच्या ताब्यातील दुचाकी चा टायर अचानक फुटल्याने भिषण अपघात झाला.

यात अभियंता शुभम पाटील या नवविवाहीत तरुणाचा दुदैवी मृत्यु झाला. शुभमचा अपघातात मृत्यु झाल्याची खबर त्याच्या जन्म गावी मिळताच संपुर्ण गावात शोककळा पसरली. शुभम हा पाटील कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता . शुभम पाटील याच्या मृतदेहाचे यावलच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असुन, यावल पोलीस ठाण्यात यांनी खबर दिल्याने अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

भुसावळ यावल दरम्यान असलेल्यां अंजाळे गावा जवळच्या मोर नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाच्या आंधळ्या वळणावर यापुर्वी देखील वाहनांचे अपघात होवुन अनेकांनी प्राण गमावले आहेत. पुलावरील वळणाचा भाग हा चुकीच्या पध्दतीने बांधण्यात आल्याने या ठिकाणी वारंवार वाहनांचे अपघात होत असल्याची संतप्त प्रतिक्रीया वाहनचालक व नागरीकांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound