Home Cities जळगाव जळगावात श्री नेहरू चौक मित्र मंडळाचा ४३ वा शस्त्रपूजन सोहळा उत्साहात ;...

जळगावात श्री नेहरू चौक मित्र मंडळाचा ४३ वा शस्त्रपूजन सोहळा उत्साहात ; खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे यांची उपस्थिती

0
8

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विजयादशमीनिमित्त जळगावातील श्री नेहरू चौक मित्र मंडळातर्फे मंगळवारी (दि. २० ऑक्टोबर) पारंपरिक शस्त्रपूजन आणि ध्वजपूजन सोहळा उत्साहात पार पडला. यंदा या ऐतिहासिक परंपरेचे ४३ वे वर्ष होते. ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात विविध मान्यवरांच्या हस्ते विधिवत शस्त्रपूजन करण्यात आले. त्यानंतर ध्वजस्तंभाचे पूजन करून उपस्थितांनी एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.

श्री नेहरू चौक मित्र मंडळातर्फे अनेक वर्षांपासून विजयादशमीच्या निमित्ताने शस्त्रपूजनाची परंपरा जपली जात आहे. यंदाही धार्मिक विधी आणि पारंपरिक पद्धतीने हा सोहळा साजरा करण्यात आला. ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात शस्त्रपूजन झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजस्तंभाचे पूजन करण्यात आले. यावेळी परिसरात उत्साहाचे वातावरण होते. या सोहळ्याला खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजूमामा भोळे, जळगावच्या महापौर दीपमाला काळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी मोघे, भाजपचे पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, भाजपचे महापालिकेतील गटनेते प्रकाश बालाणी आणि नगरसेवक सागर सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याशिवाय जळगाव पीपल्स बँकेचे माजी चेअरमन भालचंद्र पाटील, केशव स्मृती समूहाचे अध्यक्ष भरत अमळकर, ॲड. विपिन पाटील, दिलीप गांधी, शैलेश ठाकरे, संदीप रडे आणि अतुल हाडा यांच्यासह अन्य मान्यवर व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. विजयादशमीच्या निमित्ताने शस्त्रपूजन आणि ध्वजपूजनाची ऐतिहासिक परंपरा सातत्याने जपल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी श्री नेहरू चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष अजय गांधी यांचे विशेष कौतुक केले. सांस्कृतिक आणि पारंपरिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने मंडळाचे कार्य महत्त्वाचे असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


Protected Content

Play sound