यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय संविधानाने दिलेल्या मताधिकाराच्या संरक्षणासाठी आणि निष्पक्ष निवडणुकांच्या पुनर्रचनेसाठी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी यावल तर्फे महामहीम राष्ट्रपती महोदयांना उद्देशून तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या वादग्रस्त निर्णयांमुळे व कार्यपद्धतीमुळे निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा आणि त्यांच्या विरोधात निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यावल शहराध्यक्ष मोहम्मद हकीम मो. याकुब यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३२६ नुसार १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा घटनात्मक अधिकार प्राप्त आहे. तसेच अनुच्छेद ३२४ नुसार स्वतंत्र, निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या विशेष सखोल मतदारयादी पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेत पात्र भारतीय नागरिकांची नावे चुकीच्या पद्धतीने वगळली जात असल्याच्या गंभीर तक्रारी समोर येत आहेत. यामुळे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या घटनात्मक अधिकारांवर आणि निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर शंका उपस्थित होत आहे.
काँग्रेस पक्षाने निवेदनाद्वारे प्रमुख मागण्या मांडताना SIR प्रक्रिया तात्काळ स्थगित करून रद्द करण्यात यावी आणि देशातील विशेष सखोल
मतदारयादी पुनरीक्षणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासोबतच, मतदारयादीतून चुकीच्या पद्धतीने वगळण्यात आलेल्या सर्व पात्र नागरिकांची नावे योग्य नोटीस, सुनावणी आणि अपिलाची संधी देऊन पुन्हा समाविष्ट करण्यात यावीत. कोणत्याही पात्र मतदाराचे नाव योग्य प्रक्रियेशिवाय वगळण्यात येऊ नये, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसने मांडली आहे.
मतदारयादी पुनरीक्षणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासोबतच, मतदारयादीतून चुकीच्या पद्धतीने वगळण्यात आलेल्या सर्व पात्र नागरिकांची नावे योग्य नोटीस, सुनावणी आणि अपिलाची संधी देऊन पुन्हा समाविष्ट करण्यात यावीत. कोणत्याही पात्र मतदाराचे नाव योग्य प्रक्रियेशिवाय वगळण्यात येऊ नये, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसने मांडली आहे.
याशिवाय, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व उत्तरदायी करण्यासाठी मतदारयादीतील बदल, वगळलेल्या नावांची कारणे आणि संबंधित आकडेवारी सार्वजनिक करून निवडणूक आयोगाची निष्पक्षता सुनिश्चित करण्यात यावी, असेही पत्रात नमूद केले आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM) बंद करून पारंपरिक मतपत्रिकेद्वारे (Ballot Paper) मतदान पद्धती पुन्हा लागू करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी काँग्रेस पक्षाने लावून धरली आहे. एकाही पात्र भारतीय नागरिकाचा मताधिकार हिरावला जाऊ नये, यासाठी योग्य ती घटनात्मक व कायदेशीर कारवाई तातडीने करण्यात यावी, अशी विनंती निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
यावल येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली, तसेच SIR प्रक्रिया रद्द करून मतपत्रिकेद्वारे (Ballot Paper) निवडणुका घेण्याचा आग्रह धरण्यात आला.शहर भारतीय काँग्रेस कमेटीच्या वतीने यावल तहसील कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर किनगाव ग्राम पंचायत सदस्य किरण सोनवणे यांनी भारतीय संविधानाचे वाचन केले व यावेळी उपस्थितांनी संविधानाची शपथ घेण्यात आली व देशाचे मुख्य निवडणुक आयोग ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.याप्रसंगी कांग्रेस कमेटी यावल तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील,शहर अध्यक्ष मो.हकीम शेख याकुब,अमोल भिरूड ,टेनु सोनार ,नगरसेवक समिर खान, नासिर खान,करीम मन्यार ,मजहर शेख,नईम शेखआदी उपस्थित होते.



