Home Cities जळगाव स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

0
3

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, जळगाव येथील भाषा व वाङमय मंडळातर्फे भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. कलाम यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याला उजाळा देत विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्या राजश्री महाजन यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादनाने झाली. प्रमुख वक्ते प्रा. राजेंद्र निकुंभ यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगितले. स्वानुभवातून शिकत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवन घडवावे, हा महत्त्वपूर्ण संदेश डॉ. कलाम यांच्या जीवनातून मिळतो. यश संपादन करण्यासाठी मेहनत आणि सचोटी आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्या प्रा. राजश्री महाजन यांनी डॉ. कलाम यांनी राष्ट्रासाठी दिलेले योगदान अनमोल असल्याचे सांगितले. वाचन प्रेरणा दिनानिमित्त प्रा. रूपम निळे, प्रा. योगेश धनगर आणि प्रा. ईशा वडोदकर यांनी डॉ. कलाम यांच्या ‘अग्निपंख’ या पुस्तकातील उताऱ्यांचे वाचन केले. तसेच वाचन प्रेरणा अभियानांतर्गत विद्यार्थी आणि शिक्षकांनी विविध पुस्तकांचे वाचन केले.
यावेळी उपप्राचार्या प्रा. आर. एस. महाजन, पर्यवेक्षिका प्रा. शिल्पा सरोदे, समन्वयक प्रा. उमेश पाटील, प्रा. गुणवंत वंजारी आणि भाषा व वाङमय मंडळाचे अध्यक्ष प्रा. अर्जुनशास्त्री मेटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. संदीप वानखेडे, प्रा. रूपम निळे, डॉ. जयंत इंगळे, प्रा. आर. एन. निकुंभ, प्रा. संध्या महाजन, प्रा. योगेश धनगर आणि प्रा. ज्योती मोरे यांनी सहकार्य केले.

 


Protected Content

Play sound