Home Cities जळगाव दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्रासाठी मदतीचा हात; राजूमामा भोळेंचे २ लाखांचे योगदान

दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्रासाठी मदतीचा हात; राजूमामा भोळेंचे २ लाखांचे योगदान

0
16

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी आमदार राजूमामा भोळे यांनी सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी हा धनादेश मुख्यमंत्री महोदयांकडे देण्यात आला.

राज्यातील दुष्काळामुळे शेतकरी, शेतमजूर तसेच ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांसमोर आर्थिक आणि सामाजिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या संकटाच्या काळात शासनाच्या मदत योजनांसोबतच समाजातील सक्षम घटकांनीही पुढाकार घेऊन गरजूंच्या मदतीसाठी हातभार लावणे आवश्यक आहे, या भावनेतून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ही मदत करण्यात आल्याचे आमदार भोळे यांच्या कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.

“दुष्काळ ही केवळ शासनाची जबाबदारी नाही. अशा कठीण परिस्थितीत समाजातील प्रत्येक सक्षम घटकाने आपली सामाजिक बांधिलकी जपणे गरजेचे आहे. आपल्या क्षमतेनुसार केलेली मदत एखाद्या गरजू कुटुंबासाठी मोठा आधार ठरू शकते,” असे आमदार राजूमामा भोळे यांनी म्हटले.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जळगावसह संपूर्ण महाराष्ट्रातील उद्योजक, व्यापारी, दानशूर नागरिक, सामाजिक व सेवाभावी संस्था तसेच विविध क्षेत्रांतील सक्षम व्यक्तींनी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपल्या क्षमतेनुसार योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

“आज आपण दिलेला मदतीचा हात उद्या एखाद्या कुटुंबाला संकटातून सावरण्याचे बळ देऊ शकतो. दुष्काळाच्या या कठीण काळात ‘मी समाजासाठी काय करू शकतो?’ या भावनेतून प्रत्येकाने पुढे येण्याची गरज आहे,” असेही भोळे यांनी स्पष्ट केले.

दुष्काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना सुरू आहेत. मात्र, शासनाचा हात आणि समाजाची साथ एकत्र आल्यास मदतीचे हे कार्य अधिक व्यापक होऊन अनेक संकटग्रस्त कुटुंबांना आधार मिळू शकतो. याच उद्देशाने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ लाख रुपयांचे योगदान देण्यात आले असून, इतर सक्षम घटकांनीही या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार राजूमामा भोळे यांनी केले. दुष्काळाच्या संकटात शासनासोबत समाजानेही उभे राहावे, या उद्देशाने आमदार राजूमामा भोळे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ लाख रुपयांची मदत देत सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला आहे.


Protected Content

Play sound