यावल, प्रतिनिधी | येथील तहसील कार्यालयात आपल्या शासकीय सेवेत कार्याचा ठसा उमटवुन वरिष्ठांचे लक्ष वेधणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांचा महसुलदिनी उत्कृष्ट कर्मचारी म्हणुन प्रशस्तीपत्र देवुन गौरवण्यात आले.
या संदर्भात महसुल सुत्राकडुन मिळालेल्या माहीतीनुसार, यावल येथील तहसील कार्यालयातील अव्वल कारकुन रवीन्द्र भगवान माळी (मुळ रा. लासुर ता. चोपडा) यांना उत्कृष्ट अव्वल कारकून अरूण वासु वसावे (रा. अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार) यांना उत्कृष्ट लिपिक हा पुरस्कार देण्यात आला. उत्कृष्ट शिपाई म्हणुन यावल येथील राहणारे युनुस खान युसुफ खान यांना रावेर येथे महसुल दिनी झालेल्या कार्यक्रमात विभागाचे प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांच्या हस्ते व रावेरच्या तहसीलदार उषारानी देवगुणे, यावलचे तहसीलदार जितेन्द्र कुवर, नायब तहसीलदार संजय तायडे, निवासी नायब तहसीलदार आर. के.पवार तसेच रावेर आणि यावल येथील तलाठी मंडळ अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार वितरीत करण्यात आले, त्यांनी मिळवलेल्या या सन्मानाबद्दल त्यांचे यावल तहसीलच्या सर्व अधिकारी आणी कर्मचाऱ्यांनी स्वागत करीत त्यांचे अभीनंदन केले.