वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वरणगाव येथे शासकीय शालेय जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत जिल्ह्यातील ९ शाळांमधील सुमारे ७० ते ७५ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. विविध वयोगटांत विद्यार्थ्यांनी कौशल्याचे प्रदर्शन करत उल्लेखनीय कामगिरी केली. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांची पुढील नाशिक विभागीय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्पर्धेचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा सौ. वंदना ताई पाटील, ज्येष्ठ संचालक संजय दादा चौधरी, शाळेचे प्राचार्य सी. जे. तायडे, उपमुख्याध्यापक डी. आर. कोळंबे आणि पर्यवेक्षक पी. एस. झोपे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या जिल्हास्तरीय स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वरणगाव, बियाणी मिलिटरी स्कूल, बियाणी पब्लिक स्कूल, विवेकानंद प्रतिष्ठान सावखेडा, माध्यमिक विद्यालय जळगाव, काशिनाथ पिल्लोड स्कूल जळगाव, लिटिल व्हॅली स्कूल कासोदा, यादव दगडू पाटील विद्यालय तांदळवाडी आणि सावरा इंटरनॅशनल स्कूल तरसोद या शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
१४ वर्षांखालील मुलांच्या गटात लिटिल व्हॅली जळगावचा दुर्गांक पंकज सोनवणे याने प्रथम क्रमांक मिळवला. महात्मा गांधी विद्यालय वरणगावचा गौरव चंद्रकांत चौधरी द्वितीय, पुष निलेश भोळे तृतीय, वेदांत योगेश भाई चतुर्थ आणि भुवन मनोज बोदडे पाचव्या क्रमांकावर राहिले.
१७ वर्षांखालील मुलांच्या गटात महात्मा गांधी विद्यालय वरणगावचा अभिनव कैलास जोहरे याने प्रथम क्रमांक मिळवला. मंथन विनोद जाधव द्वितीय, बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळचा पियूष राजेश्वर मुळे तृतीय, चिराग चंद्रकांत फेगडे चतुर्थ आणि लुकेश भिका बनकरी पाचव्या क्रमांकावर राहिले.
१९ वर्षांखालील मुलांच्या गटात निखिल संतोष भाई याने प्रथम, चैतन्य विनोद भाई याने द्वितीय तर धाराव लक्ष्मीकांत नेमाडे याने तृतीय क्रमांक पटकावला.
१४ वर्षांखालील मुलींच्या गटात काशिनाथ पिल्लोड स्कूल जळगावची सारा निलेश अजणाडकर प्रथम, विवेकानंद प्रतिष्ठान सावखेडाची अवनी मनोज कोळी द्वितीय, काशिनाथ पिल्लोड स्कूलची आर्या योगेश भोळे तृतीय, माध्यमिक विद्यालय जळगावची तुलसी रवींद्र महाजन चतुर्थ तर बियाणी पब्लिक स्कूल भुसावळची भावना विनोद पाटील पाचव्या क्रमांकावर राहिली.
१७ वर्षांखालील मुलींच्या गटात बियाणी पब्लिक स्कूल भुसावळची वैष्णवी रवींद्र धनगर प्रथम आली. अनन्या तुषार सोनवणे द्वितीय, जागृती रमेश वसतकर तृतीय, सावरा इंटरनॅशनल स्कूल तरसोदची साची सचिन कुचेरिया चतुर्थ तर बियाणी पब्लिक स्कूलची श्रुती विनोद वाघ पाचव्या क्रमांकावर राहिली.
१९ वर्षांखालील मुलींच्या गटात महात्मा गांधी विद्यालय वरणगावची सृष्टी सुनील चौधरी हिने प्रथम क्रमांक मिळवला. माध्यमिक विद्यालय जळगावची लावण्या नरेश सोनवणे द्वितीय, सावरा इंटरनॅशनल स्कूल तरसोदची औषिका आनंद शर्मा तृतीय तर प्रेमळ प्रवीण इंगळे हिने चतुर्थ क्रमांक मिळवला.
स्पर्धेचे पंच म्हणून गणेश बोदडे, सचिन चौधरी, वीरेंद्र हळदे, गणेश टिनटोरे आणि आशुतोष भाई यांनी काम पाहिले. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील नाशिक विभागीय मल्लखांब स्पर्धेसाठी पात्रता मिळाली असून ही स्पर्धा नाशिक येथे होणार आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक जयंत जोशी, आशिष चौधरी, लक्ष्मीकांत नेमाडे आणि एस. के. चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या कामगिरीबद्दल शाळा व संस्थेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. जिल्हास्तरीय स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पारंपरिक मल्लखांब क्रीडेतील कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ मिळाले असून आता नाशिक विभागीय स्पर्धेतही चांगली कामगिरी करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून तयारी केली जात आहे.



