भुसावळ येथे श्री राधाकृष्ण प्रभात फेरीचा सहावा वर्धापन दिन साजरा

prabhat feri

भुसावळ, प्रतिनिधी | येथील श्री राधाकृष्ण प्रभात फेरीच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आज (दि.७) विविध कार्यक्रम घेण्यात आले. सकाळी शहरातील प्रोफेसर कॉलनीतील शर्मा हॉस्पीटल परीसरात ५० वृक्ष लावण्यात आले. त्यानंतर व्यंकटेश बालाजी मंदिरात भजन संध्या कार्यक्रम झाला. संध्याकाळी कार्यक्रमात राधाकृष्णावर आधारीत भजने गाण्यात आली तसेच नृत्याचा कार्यक्रम झाला.

 

यावेळी आमदार संजय सावकारे, राधेश्याम लाहोटी, नगरसेवक मनोज बियाणी, बियाणी एज्युकेशनच्या सेक्रेटरी संगीता बियाणी, सामाजिक कार्यकर्ते जे.बी.कोटेचा, रेल्वेचे सेवानिवृत्त वाणिज्य निरीक्षक जी.आर.ठाकूर, डॉ.शर्मा, नगरसेवक अॅड. बोधराज चौधरी, विणा लाहोटी, शशी लाहोटी, श्यामा लढ्ढा, रसीला पटेल, निर्मला चौधरी, कृष्णा भराडीया, राज भराडीया, साधना शर्मा, प्रिया अग्रवाल, सुनिल लाहोटी, जगदीश शर्मा यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांचे आभार राधेश्याम लाहोटी यांनी मानले. यानंतर महाप्रसादाचाही कार्यक्रम झाला.

Protected Content