यशस्वी करिअरसाठी स्वतःत गुंतवणूक करा ; डॉ. गिरीश कुलकर्णी

WhatsApp Image 2019 08 07 at 6.39.56 PM

भुसावळ, प्रतिनिधी | चांगले विचार, उत्तम आचार, संयम, शिस्त व सकस वाचन ह्या गुणांचे संवर्धन म्हणजे स्वतःतील गुंतवणूक असून यशस्वी करिअरसाठी ह्या गुणांचे बलवर्धन ही सगळ्यात महत्वाची गुंतवणूक असल्याचे प्रतिपादन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम विभागाचे विभाग प्रमुख डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी केले. ते श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेशीत भावी अभियंत्यांसाठी आयोजित “प्रेरणा महोत्सवात ” बोलत होते.

भावी अभयिंत्यांना अभियांत्रिकी क्षेत्राची ओळख व्हावी व फक्त पुस्तकी ज्ञानातच न अडकून पडता उपयोजीत आणि प्रात्यक्षिक ज्ञानाच्या दिशेने विद्यार्थ्यांची जडण घडण व्हावी हा या कार्यक्रमाचा उद्देश असतो. उत्तम पुस्तके ही उत्तम विचार निर्माण करतात व हीच उत्तम पुस्तके उत्तम मार्गदर्शक बनून मोहाचे क्षण टाळायला आणि योग्य निर्णय घ्यायला आपल्याला मदत करातात असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगतिले.बौद्धकि सत्रा दरम्यान प्रा. कुलकर्णी यांनी नेतृत्व गुण, संघबांधणी, परस्परसहकार्य, आचार आणि विचार यांच्यातील प्रगल्भता तसेच संयम व शिस्त यांचे महत्व ह्या यशस्वी आयुष्यासाठी अत्यंत महत्वाच्या बाबींवर मार्गदर्शन केले.प्रा .किशोर चौधरी यांनी आयुष्यातल्या समतोल वागणुकीवषियी मार्गदर्शन केले. वाचन, विचार आणि कृती यांच्यात सर्वोत्कृष्ट ताळमेळ जमवण्यासाठी प्रयत्न करत राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रा. चौधरी यांनी सांगितले. यशस्वी करिअरसाठी कोणतेही शॉर्ट कट्स नसतात तर निखळ आनंद आणि निर्भीळ यशासाठी कठोर परिश्रम व आत्म-संयमन अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगतिले. याप्रसंगी प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, अकॅडमीक डीन डॉ.राहुल बारजिभे, विभाग प्रमुख प्रा.सुधीर ओझा, डॉ. पंकज भंगाळे, डॉ.गिरीश कुलकर्णी, प्रा.अजित चौधरी उपस्थित होते.

Protected Content