


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यावल तालुका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी, यावल शहर काँग्रेस कमिटी आणि फैजपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने रावेर येथे संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधत आगामी निवडणुकांसह संघटनात्मक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावलचे माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी होते. रावेर-यावल मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष मधूकरराव चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावल तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी बैठकीची प्रस्तावना केली. बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने पक्षाची संघटनात्मक तयारी, स्थानिक पातळीवरील प्रश्न आणि कार्यकर्त्यांची भूमिका याबाबत चर्चा करण्यात आली. बूथ स्तरापासून काँग्रेसची संघटना अधिक सक्रिय करण्याबरोबरच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढविण्यावर भर देण्यात आला. गावागावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रभावीपणे काम करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. आगामी काळात जनतेच्या प्रश्नांवर अधिक जोमाने काम करत पक्षाची संघटना मजबूत करण्याचा निर्धार पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला. या संवाद बैठकीदरम्यान विविध पक्षांतील काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. नव्याने काँग्रेस परिवारात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. तसेच त्यांच्या पुढील सामाजिक आणि संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती लीलाधर चौधरी, काँग्रेस पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी, माजी पंचायत समिती सदस्य विलास तायडे, यावल काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष हकीम शेख, फैजपूर शहराध्यक्ष रियाजभाई यांच्यासह गणेश गुरव, उमेश जावळे, धीरज कुरकुरे, टेनू सोनार, अमोल भिरूड, उमर कच्छी, नितीन सपकाळे, अरुण कोळी, गफूर तडवी, शेख अश्रम, शेख खलाल, शेख नईम, शेख शरीफ, दीपक कोळी, भागवत पाचपुळे, सुगदेव बोदडे, अनिल महाजन, वासुदेव पाटील, भरत पाटील, भोजराज पाटील, सतीश टायडे, सय्यद असद जावेद, मारूळचे माजी लोकनियुक्त सरपंच सय्यद असद अहमद, कदीर उस्मान, सय्यद जिया उलहख, शेख गफ्फार, विजय पाटील, राजू सेवालाल, कल्पना तायडे, अजय रामदास तायडे, सचिन पाटील, राजेंद्र भारंबे, यावल युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष अनिल कोळी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच सुनील पाटील, किशोर पाटील, संजय वराडे, गुलामगौस, शेख निसार, शेख हमीद, करीम मन्न्यार, नगरसेवक प्रकाश सराफ, योगेश वसंत भावसार, डॉ. गणेश भगवान चौधरी, तुषार राणे, कुणाल चौधरी, महेबूब पिंजारी, श्यामराव मेढे, ज्ञानेश्वर बऱ्हाटे, मुंगा धर्मा सोनावणे, दुलकू मेळे, लतीफ तडवी, सब्दल तडवी, राजू तडवी, रमजान तडवी, ज्ञानेश्वर चौधरी, राजेंद्र चौधरी, युवराज चौधरी, नीरज चौधरी, जगदीश महाजन, चंद्रकांत चौधरी, निजामुद्दीन, डॉ. दानिश बीन सर, इरफान मेंबर, मुक्तार शेख, शेख रियाज, तसलीम मेंबर, आसिफ, गिरीश देशमुख, दिलरुबाब तडवी, शरद पाटील, सरपंच पिंजारी, शुभम विसावे, प्रसन्न महाजन, विकास अभिमन्यू, महेंद्र उद्धव धांडे, अजय वसंत टायडे, ज्ञानेश्वर टायडे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.



